MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, ३ मार्च, २०२२

Mountains, hills and creeks in Maharashtra-महाराष्ट्रातील डोंगररांगा,टेकड्या व खाडी

 


किनारपट्टीचा प्रदेश

महाराष्ट्राच्या पश्चिमेस  सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन भूभाग खचण्यामुळे किनारपट्टी तयार.

समुद्रकिनाऱ्याच्या खचण्यामुळे तयार झाल्याने या किनाऱ्यास 'रिया (Ria) प्रकारचा किनारा' म्हणतात

कोकण समुद्रकिनाऱ्याची लांबी - ७२० किमी

उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये किनारपट्टीची रूंदी सर्वाधिक - १०० किमी 

मालवण, हर्णे गावाजवळ  -सागरी गुहा (Sea Caves)

♦️सर्वाधिक किनारपट्टी असणारे जिल्हे

रायगड  - सुमारे 240 किलोमीटर 

रत्नागिरी - सुमारे 167 किलोमीटर

सिंधुदुर्ग -सुमारे 121 किलोमीटर

ठाणे - सुमारे 113किलोमीटर 

 

*महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा -

🔶सह्याद्री डोंगररांग

महाराष्ट्राच्या पश्चिम भागात समुद्रकिनाऱ्यापासून ३० ते ६० किमी अंतरावर  दक्षिणोत्तर  पसरलेली पर्वतरांग.

उत्तरेस तापी ते दक्षिणेस कन्याकुमारी दरम्यान.

 महाराष्ट्रातील लांबी ६४० किमी (सरासरी उंची १२०० मीटर).

पश्चिम घाट (Western Ghat) -२००६ साली युनेस्को ने जागतिक वारसा घोषित केले 

भारताच्या एकुण क्षेत्रापैकी ४० % क्षेत्रास पाणीपुरवठा पश्चिमघाटातून उगम पावणाऱ्या नद्यांपासून.

हा  प्रकारचा (Residual) पर्वत आहे.

♦️ महाराष्ट्रातील इतर डोंगररांगा

उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगररांगाचा क्रम पुढीलप्रमाणे -

🔶सातपूडा डोंगररांग 

नर्मदा व तापी नदीच्या खोऱ्यांना अलग करून त्यांचा जलविभाजक म्हणून कार्य करते. 

या डोंगररांगांतील प्रमुख टेकड्या व शिखरे.

•नंदुरबार अस्तंभा पठार (उंची १३२५ मीटर)

•तोरणमाळ पठार (उंची : १०३६ मी)

•अमरावती गाविलगड टेकड्या

•चिखलदरा (उंची : १११५ मी.)

•बैराट शिखर (उंची : ११७७ मी.)

ब) सातमाळा- अजिंठा डोंगररांग

तापी व गोदावरी नदीच्या खोऱ्यांना अलग करणारे जलविभाजक 

• सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस या डोंगररांगा.

• सर्वसामान्य उंची -२०० ते ३०० मीटर

 • किल्ले - दौलताबाद_(औरंगाबाद )

• लेण्या - अजिंठा, वेरूळ (औरंगाबाद )

•अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या वळणावरच्या खडकात.

♦️हरिश्चंद्र -बालाघाट  डोंगररांगा

• गोदावरी व भीमा नदीचे खोरे अलग करणारी डोंगररांग

 • जिल्हे - पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर व बीड

 • बालाघाट -सपाट माथ्याचा प्रदेश.

 • किल्ले - शिवनेरी

♦️महादेव डोंगररांगा

• भीमा व कृष्णा नदीचे खोरे अलग करतात

हरिचंद्र बालाघाट डोंगररांगेच्या दक्षिणेस.

•शंभूमहादेवाचे' प्रसिध्द मंदिर म्हणून 'शंभू महादेव डोंगररांगा अशी ओळख.

 रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत विस्तार

सातारा, सांगली व अहमदनगर जिल्ह्यात पसरल्या 

♦️किल्ले : अजिंक्यतारा, सज्जनगड, वर्धनगड, वसंतगृह, सदाशिवगड, मच्छिंद्रगड

♦️उत्तर महाराष्ट्रातील डोंगर

*तोरणमाळचे डोंगर

•नंदुरबार जिल्ह्यात पसरले.

• सरासरी उंची - १०३६ मीटर

• शिखरे - अस्तंभा शिखर (१३२५मीटर)

• तोरणमाळ - वायव्य महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचे ठिकाण या डोंगर रांगेत 

*गाविलगड व मेळघाटचे डोंगर

•अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात  पसरल्या.

• बैराट - सर्वात मोठे शिखर (उंची ११७७ मीटर)

• चिखलदरा - १११८ मीटर उंची.

♦️ पूर्वेकडील महाराष्ट्रातील डोंगर व टेकड्या

नागपूर -१) गरमसूर, २) अंबागड ३) मनसर

चंद्रपूर व गडचिरोली -१) भामरागड, २)सुरजगड ३) चिरोली ४) चांदूरगड ५) चिमुर

भंडारा - १) दरकेसा २) नवेगाव 

♦️महाराष्ट्रातील डोंगर व टेकड्या आणि त्यांचे जिल्हे

जिल्हा 

जिल्ह्यातील डोंगर व टेकड्यांची नावे

गोंदिया

१)नवेगाव २)चिंचगड ३)गंगाझरी ४)गायखुरी ५)दरकेसा ६) प्रतापगड

 भंडारा

१) चादपूर २) गायमुखा ३) अंबागड ४) कोका ५) भीमसेन

 अमरावती

१) गाविलगड २) पोहरा ३) जीनगड ४)चिरोडी

मुंबई शहर

१) मलबार हिल २) शिवडी ३) अँटॉप हिल

 मुंबई उपनगर

१) घाटकोपर २) तुर्भे ३) गिल्बर्ट ४) कान्हेरी

 उस्मानाबाद

१) तुळजापूर २) नळदूर्ग .

 गडचिरोली

१) चिरोली २) भागरागड ३) सुरजगड ४) टिपागड५) सिरकोंडा ६) चिकियाला

 चंद्रपूर

१)चिमूर २)पेरजागड ३) चांदुरगड ४) मुल टेकड्या .

 धुळे

१) गाळणा २) धानोरा

 नांदेड

१) निर्मल२) मुदखेड ३) सातमाळा .

 हिंगोली

१) हिंगोली 

 यवतमाळ

 -१) पुसद टेकड्या

 नागपूर

१) गरमसूर २) पिल्कापार ३)चापेगडी ४)पिपरडोल ५)जांबगड ६)अंबागड ७)महादागड

 वर्धा

१) रावणदेव २) गिरड ३)हरणखुरी ४)बहिरम ५)तिगाव ६)ब्राम्हणगाव ७)नांदगाव ८)मोलेगाव

 पुणे

१) ताम्हणी २)तसुमाई ३) पुरंदर ४) अंबाला ५) शिंगी

 बीड

१) चिंचोली २) नाकनूर

 सांगली

१) मुचुंडी २)आष्टा ३)शुक्राचार्य ४) बेलगवाड ५)दंडोबा ६)मल्लिकार्जून ७)कमळभैरव ८)होनाई

 कोल्हापूर

 १) पन्हाळा २) दुधगंगा ३) चिकोडी

 सातारा

१) आगाशिव २) बामणोली ३) महादेव ४)म्हस्कोबा ५) परळी ६) मढोशी ७) मांढरदेव ८) सीताबाई ९) औंध १०) महिमान ११) यवतेश्वर

 नाशिक

१) सातमाळा २) साल्हेर-मुल्हेर ३) वणी ४) चांदवड

 अहमदनगर

१) हरिश्चंद्रगड २) बाळेश्वर ३) अदुला ४)कळसूबाई

 औरंगाबाद

१) सुरपालनाथ २)चौक्या ३) अजिंठा-वेरूळ

 जळगाव

१) शिरसोळी २) हस्ती ३) घोडसगाव ४) चांदोर

♦️खाडी (Creek)

•समुद्रापासून जमीनीच्या दिशेने घुसलेल्या पाण्याच्या अरूंद प्रवाहास ‘खाडी' म्हणतात.

महाराष्ट्रातील नद्यांच्या खाड्या -

 खाडीचे नावं

  जिल्ह्याचे नाव

 खाडीचे नावं

  जिल्ह्याचे नाव

मालाड

 मुंबई शहर व उपनगर

 कर्ली 

 सिंधुदुर्ग

आचरा

 सिंधुदुर्ग

कलावली(भट)

 सिंधुदुर्ग

विजयदुर्ग(शुक)

रत्नागिरी/सिंधुदुर्ग

 देवगड 

 सिंधुदुर्ग

पुर्णगड(मुंचकुदी)

 

जैतापूर(काजवी)

 रत्नागिरी/सिंधुदुर्ग 

 भाट्ये (काजळी)

 रत्नागिरी

जयगड(शास्त्री)

 रत्नागिरी

 दाभोळ (वशिष्ठी)

 रत्नागिरी

 रोहा

 पनवेल

 माहिम

 मुंबई शहर व उपनगर

 राजापुरी

 पनवेल

 रायगड

 पनवेल

 बाणकोट

रायगड व रत्नागिरी 

 धरमतर

 पनवेल

केळशी(भारजा)

 रत्नागिरी

  डहाणू

 पालघर

मनोरी (दहिसर)

 मुंबई शहर व उपनगर

 

 

 

 

 * धरमतर खाडी (रायगड) - पाताळगंगा नदीमुखाशी तयार होणारी खाडी महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी .

♦️बेट (Islands)

बेटांचे तीन प्रकार -

१) सागरकिनाऱ्यावरील बेटे उदा. जंजीरा, उंदेरी(रायगड)

२) समुद्रांतर्गत बेटे उदा. अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप बेट समुह

३) नदीप्रवाहात निर्माण झालेली बेटे उदा. माजुली बेट(ब्रम्हपुत्रा नदी)

*महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर अनेक बेटे तयार झाली आहेत.

*माजुली बेट (आसाम)- सर्वात मोठे बेट जिल्हा म्हणून  घोषित

  जिल्हा 

 बेटाचे नाव

सिंधुदुर्ग 

कुरटे

रायगड 

घारापुरी,खांदेरी,कुलाबा,उंदेरी,कासा,जंजिरा.

मुंबई शहर व उपनगर  

मुंबई

मुंबई शहर व उपनगर  

मढ

मुंबई शहर व उपनगर  

साष्टी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा