MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

कलम 79 ते 122 पर्यंत भारतीय संविधान


 प्रकरण दोनः संसद (कलम 79-122)

सर्वसाधारण (कलम 79-88)

७९.संसदेची रचना-लोकसभा(कनिष्ठ)+राज्यसभा(वरिष्ठ )

८०. राज्यसभेची रचना.(महत्तम संख्या -250)

८१. लोकसभेची रचना.(महत्तम संख्या -552)

 ८२. प्रत्येक Census जनगणनेनंतर पुनर्रचना.(पुनर्रचना आयोग कायदा 2002)

८३. संसदेच्या सभागृहांचा कालावधी.

८४. संसदेच्या सदस्यत्वाकरता अर्हता.(पात्रता-Eligibilty  /अपात्रता-Disqualification ) राज्यसभेसाठी वय -30 years तर लोकसभेस 25 years पुर्ण )

८५. संसदेची सत्रे, सत्रसमाप्ती व विसर्जन. 

*अर्थसंकल्पिय सत्र -  फेब्रुवारी February - May मे 

 * पावसाळी सत्र - जुलै July- September सप्टेंबर 

* हिवाळी सत्र - नोव्हेंबर November - December डिसेंबर

 *अधिवेशनाच्या कामकाजाची पूर्ती झाल्यास -सत्र समाप्ती * केवळ लोकसभा विसर्जित होते.

८६. राष्ट्रपतींचा सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा & संदेश पाठवण्याचा हक्क.

८७. राष्ट्रपतींचे विशेष अभिभाषण.

८८. मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहाबाबत हक्क.( Attorney General of India -दोन्ही सभागृहात, बैठकात भाग घेऊ शकतात पण मतदानाचा (voting) अधिकार नाही.

संसदेचे पीठासीन अधिकारी (कलम 89-98)

८९. राज्यसभेचा सभापती व उप सभापती

९०. उप सभापतिपद रिक्त होणे, त्यांनी राजीनामा Resignation देणे and त्यांना पदावरून दूर करणे.

९१. उप सभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापपती म्हणून कार्य करण्याचा अधिकार.(Maximum - 6 सदस्य members)

९२. सभापतीस Speaker Or Deputy Speaker उप सभापतीस पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतांना त्याने अध्यक्षस्थान न स्विकारणे.

९३. लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष.

९४. अध्यक्षपद व उपाध्यक्षपद रिक्त होणे, त्याचा राजीनामा Resignation देणे आणि त्यांना पदावरून दूर करणे.

९५. उपाध्यक्ष Or अन्य व्यक्तीचा अध्यक्षपदाची कर्तव्ये कर्तव्ये पार पाडण्याचा Or अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार.

९६. अध्यक्ष Or  उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतांना त्याने अध्यक्षपद न स्विकारणे.

९७. सभापती- उप सभापती आणि अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचे वेतन Salary व भत्ते.

९८. संसदेचे सचिवालय (महासचिव -प्रमुख )

कामकाज चालवणे (कलम 99-100)

९९. सदस्यांनी शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे.

१००. सभागृहांमधील मतदान(voting), जागा रिक्त असतानाही कार्य करण्याचा सभागृहांचा अधिकार व गणपूर्ती.

सदस्यांची अपात्रता (कलम 101-104)

१०१. जागा रिक्त करणे. (अनुपस्थित -60 Days दिवस, दुहेरी सदस्यत्व, राजीनामा, काढून टाकणे, पदावधी संपणे etc)

१०२. सदस्यत्वाबाबत अपात्रता.(लाभाचे पद, मनोविकल, दिवाळखोर, परकीय, 2 वर्षा पेक्षा जास्त कारागृहात, सरकारी सेवेत हितसंबंध, लेखे सादर न करणे.)

१०३. सदस्यांच्या अपात्रतेबाबतच्या प्रश्नांवरील  Final Desicion(अंतिम निर्णय -President of India -राष्ट्रपतीचा )

१०४. कलम ९९ अन्वये शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा पात्र नसतांना अथवा अपात्र झाल्यावर स्थानापन्न होण्याबाबत व मतदान करण्याबद्दल शास्ती.

 संसद व  संसद सदस्य यांचे अधिकार, विशेषाधिकार व उन्मुक्ती ( कलम 105- 106)

 १०५. संसदेची सभागृहे AND  त्यांचे सदस्य व समित्याचे अधिकार, विशेषाधिकार etc.

१०६. सदस्यांचे वेतन( Salary) व भत्ते.(संसद सदस्यांचे वेतन व भत्ते, पेन्शन Act,-1954)

कायदेकारी कार्यपद्धती (कलम 107-111)

१०७. विधेयके प्रस्तुत and पारित करणे यांसंबंधी तरतुदी.

१०८.  दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक.(फक्त सामान्य आणि वित्तीय विधेयक साठी तरतूद आहे )

 १०९. धन विधेयकांबाबत विशेष कार्यपद्धती.

११०. 'धन विधयके' यांची व्याख्या.

१११. विधेयकास अनुमती.(राष्ट्रपती ची संमती )

 वित्तीय बाबींमधील कार्यपद्धती (कलम 112-117)

११२. वार्षिक वित्तीय विवरणपत्रक.

 ११३. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती.

 ११४. विनियोजन विधेयके

११५. पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने.

 ११६. लेखानुदाने, प्रत्ययानुदाने व अपवादात्मक अनुदाने.

 ११७. वित्तीय विधेयकांसंबंधी विशेष तरतुदी.

सर्वसाधारण कार्यपद्धती (कलम 118-122)

११८. कार्यपद्धतीचे नियम.

११९. वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन.

१२०. संसदेत वापरायची भाषा.

१२१. संसदेतील चर्चेवर निर्बंध.(सर्वोच्च न्यायाधीशाने Judge कर्तव्य पार पाडत असताना केलेल्या कृत्या बद्दल चर्चा करण्यास प्रतिबंध )

१२२. न्यायालयांनी संसदेच्या कामकाजाबद्दल चौकशी न करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा